न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जंतरमंतरवर देशभरातून मदतीचा ओघ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जंतरमंतर वर पावसा पाण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोमवारी तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे विद्यार्थी मैदान सोडतील असं वाटत होतं. पण विद्यार्थ्यांनी मैदान सोडलं नाही. विद्यार्थी मैदानात दटून उभे राहिले. गेल्या दोन दिवसापासून विद्यार्थी मैदानात ठाण मांडून आहेत. मिळेल ते खात आहेत. जागा मिळेल तिथे झोपत आहेत. कालची रात्र तर विद्यार्थ्यांनी जागून काढली. जंतरमंतरवर रात्रीपासून पहाटेपर्यंत काय काय घडलं? त्याचाच हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट…

जेवणाचे स्टॉल

रात्री 12:30 वाजता जंतर-मंतर परिसरात आंदोलकांची संख्या मोठी होती. या आंदोलकांना देशभरातून अन्नाचा पुरवठा होत आहे. आंदोलनाच्या ठिकाणी जेवण वाटप करण्याचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत.

आंदोलकांसाठी देशातील कान्या कोपऱ्यातून जेवण जंतर मंतर वर पाठवलं जात आहे. ऑर्डर बुक करणाऱ्यांकडून नाव जाहीर केल जात नाही. ज्यांना भूक असेल त्यांना हे अन्न द्या, अशी माहिती ते ऑर्डर घेऊन येणाऱ्या स्विगी झोमॅटोच्या मुलांना सांगत आहेत. बंगळूरू येथील एका डॉक्टरने तीन ऑर्डर पाठवल्या होत्या, त्या घेऊन एक स्वीगी बॉय जंतर मंतर इथं आला होता. 20 तारखेपासून जास्तीत जास्त ऑर्डर या इथल्याच असल्याचं त्याने टीव्ही9 सोबत बोलताना सांगितलं. दिवसातील माझ्या 90 टक्के ऑर्डर इथे पोहोच कराव्या लागत आहेत. ऑर्डर बुक करणारे अनेक जण आपल नाव सांगत नाहीत. मात्र हे अन्न पोहोचतं करायला सांगत असल्याचं त्याने सागितलंय.

दिल्ली सकाळचे 5 वाजले आहेत आणि जंतर-मंतरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलंक अजून ठाण मांडून बसले आहेत. अनेक विद्यार्थी आंदोलक हे सध्या विश्रांती घेत आहेत आणि झोपले आहेत. या भागात उकाडा असल्याने इतर विद्यार्थांकडून हवा मारण्यात येत आहेत.

स्वयंसेवी संस्था मैदानात

जंतर-मंतर परिसरातील या आंदोलनात अनेक स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलकांची मदत मिळत आहे. सध्या या परिसरात सचखंड फाउंडेशनकडून मदत करण्यात येत आहे.

नागपूरची आजीही मैदानात

नागपूरवरुन एक आजी कुटुंबासह आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली आहे. मुलांना आधार देण्यासाठी आमच्यासारख्या आईंनी पुढाकार घेतला पाहिजे. ही आमचीच मुले आहेत, असं ही आजी सांगत आहे. ज्योती बागडे असं या आजीचं नाव आहे.

विद्यार्थी उचलताहेत कचरा

जंतर-मंतर परिसरातील आंदोलनमध्ये देशभरातून मदतीचा हात पुढे होत आहे आणि सर्व जेवणाची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत आहे. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा देखील जमा होत आहे. हा कचरा या ठिकाणी एकत्र करण्याचं काम आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि तरुणांकडून होत आहे. जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे या परिसरात आंदोलक तरुण-तरुणींकडून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

जंतर-मंतर या आंदोलनस्थळी महाराष्ट्रातून अनेक आंदोलक आंदोलनसाठी आलेले आहेत. हे सर्व तरूण आहेत. हे सर्व तरूण सांगली, कोल्हापूर आणि पुण्याहून आले आहेत.तसेच जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलनाच्या स्टेज समोर जखमी तरुणांवर उपचार होत आहे. डॉक्टर याकुब खान यांच्याकडून या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

सौ.TV9 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे