साडी दिली नाही म्हणून पत्नीकडून पतीचा खून
कल्याण/ वृत्तसंस्था
क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. पतीनं साडी घेऊन दिली नाही या कारणावरून संतापलेल्या पत्नीने आधी पतीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारला आणि त्यानंतर गळा घोटून त्याला जिवे मारलं. यावेळी त्यांचा सात वर्षांचा चिमुकला देखील घरातच होता. त्याच्यासमोर आईने वडिलांना मारल्याचं त्याने पाहिलं. पोलिसांना घटना समजताच बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला तत्काळ ताब्यात घेतलं आहे. हरेराम सिंग असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव असून आरोपी पत्नीचं नाव सुनीता देवी आहे.


