समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
वर्धा/ वृत्तसंस्था
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळील रात्रीच्या सुमारास घटना घडली आहे. मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झालेला असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू असताना अपघात घडला. अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू असून महामार्ग पोलीस, पुलगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत


