नदोरा फॅशन्स ब्रँडचा माजगाव उद्यमनगरात फॅशन डिझायनर (बुटीक )सुरू …. कल्याणी अनिकेत वाडीकर हिचा उपक्रम
सिंधुदुर्ग राजू तावडे
पुणे येथे नदोरा फॅशन्स या नावाने स्वतःचा ब्रँड तयार करणारी सौ. कल्याणी अनिकेत वाडीकर हिने, माजगाव उद्यमनगर येथे फॅशन डिझायनर (बुटीक )सुरू केले आहे. तिच्या या नवीन व्यवसायाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नदोरा फॅशन हा कॉटन बेस ब्रँड असून त्यामध्ये जयपुरी कॉटन, अजरख, सांगानेरी, बगरू, कलमकारी अशा विविध प्रकारच्या कापडाचा समावेश आहे.
सौ.कल्याणी अनिकेत वाडीकर पूर्वाश्रमीची कल्याणी महेश नाईक हिने पुणे येथील आय एन आय एफ डी या नामांकित इंस्टिट्यूट मध्ये फॅशन डिझायनर ही पदवी प्राप्त केली आहे. तिने पुणे येथे नदोरा फॅशन्स या नावाने स्वतःचा ब्रँड तयार करून उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण केले होते. तिने बऱ्याच सेलिब्रिटीजना स्टाइलिंग केलेले आहे.
नदोरा फॅशन्स द्वारे कस्टमाइजेशन ऑन आउअर लिस्टेड प्रॉडक्ट्स, ऑल टाइप ऑफ ड्रेसस डिज़ाइनिंग अँड स्टिचिंग, साडी ड्रेसेस यांची सर्व्हिसेस प्रोव्हाइड केली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत नामांकित इंस्टिट्यूटमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून अशा प्रकारे बुटीकची सेवा आपल्याकडे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नदोरा फॅशन्स द्वारे महिलावर्गास त्याना शोभेल अश्या फॅशनचे, आकर्षक व दर्जेदार आवडी निवडी प्रमाणे कपडे कस्टमाइजेशन करून घेता येतील. तिची nadorafashionsbykn.com ही वेबसाईड असून instagram वर Nadora Fashions या नावाने page आहे.


