न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार आजही मार्गदर्शक … युवा नेते विशाल परब

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. समाजातील अज्ञान, रूढी आणि परंपरा दूर केल्याशिवाय समाजात नवा विचार रुजणार नाही, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी अचूकपणे ओळखले आणि शिक्षणाचा दीप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन आहे, अशा भावपूर्ण शब्दांत भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली. सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात आज भारतीय जनता पार्टीतर्फे आज महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टी महापुरुषांच्या केवळ प्रतिमांचे नव्हे तर त्या मागच्या विचारांचे पूजन करते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मागील काही कालावधीत सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले आहे. लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर वाटप याचबरोबर विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना विशाल परब यांनी सदैव सहकार्य केलेले आहे. अशाप्रकारे सामाजिक काम करण्यासाठी महात्मा फुले यांच्यासारख्या क्रांतिसूर्याचे विचार अत्यंत मोलाचे आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते आचरणात आणण्याचे आणि तळागाळातील जनतेला त्याचा लाभ मिळवून देण्याचे कार्य श्री. विशाल परब यांनी केले आहे.
सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी सोशल मीडिया अध्यक्ष श्री. केतन आजगावकर, भाजपा पदाधिकारी श्री. धीरेंद्र म्हापसेकर, श्री. साईप्रसाद भोई आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे