प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस सावंतवाडीतील गुरुकुल परिवाराकडून केक कापून साजरा.
सिंधुदुर्ग / मनोज घाटकर
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांच्या वतीने त्यांना निरोगी दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष श्री. बबन साळगावकर यांनी रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक बांधणीला विशेष महत्त्व देण्यात येत असून, तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या मार्गदर्शनातून ‘सेवा अभियानासह’ विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
“कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारे, संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देणारे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून रविंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन सावंतवाडीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे,” आज केसरी सारख्या दुर्गम भागात KSR एकवारियम पार्क यासारखा पर्यटन पूरक प्रकल्प उभारणीतून शेकडो स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.तसेच हा प्रकल्प भविष्यात जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प होईल.अशा भावना यावेळी श्री. साळगावकर यांनी व्यक्त केल्या.
“रविंद्रजी चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक वाटचाल अधिक बळकट होवो आणि त्यांच्या हातून जनसेवेची अधिकाधिक कार्ये घडोत,” तसेच पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जोमाने काम करणार अशी भावना माजी नगरसेवक सावंतवाडी नगरपरिषद श्री. विलास जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष श्री. बबन साळगावकर, माजी नगरसेवक सावंतवाडी नगरपरिषद श्री. विलास जाधव,मनोज घाटकर संतोष तळवणेकर, दीपक सावंत, बंड्या तोरस्कर, अभय पंडित, दिवाकर भांडये,सचिन माडये गौरव जाधव, ओमकार जाधव, दर्शीद जाधव,रामचंद्र राऊळ, अशोक पेडणेकर, सुनील गावडे, उदय भराडी, सुनील साहिल, तुषार राऊळ,भरत सावंत, संतोष राऊळ,बाळा सावंत,प्रवीण लाखे व रवी जाधव उपस्थित होते.यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी रविंद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.


