उष्णतेने घेतला ९ वर्षांच्या बाळाचा बळी
लातूर/ प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पाऊस आणि तापमान वाढीने जीव नकोसा केला आहे. त्यातच पारा चाळीशी पार गेल्याने उष्मघाताची भिती व्यक्त होत असतानाच औसा तालुक्यातील गोंद्रे गावात या उष्म्याने एका ९ वर्षांच्या बाळाचे निधन झाल्याची घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्यात सध्या पार ४०/४१असून या आधीही एका शेतकऱ्याचा उष्म्याने मृत्यू झाला होता.


