न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिंदेगटातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार…. दीपक केसरकर पुन्हा मंत्रीपदी?…. एकनाथ शिंदेची मिटींग

मुंबई / वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे आज शिंदेसेनेतील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. मागील दीड वर्षांतील मंत्र्यांच्या कामगिरीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्या निर्णयांच्या झालेल्या अंमलबजावणीचा ते आढावा घेणार आहेत. काही विभागांची कामं होत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारींनंतर ही बैठक होत असून यात कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी महिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

[28एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मागील दीड वर्षातील मंत्र्यांची कामगिरी, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.”

अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघांतील कामे संबंधित विभागांकडून व मंत्र्यांकडून होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची केवळ माहितीच नाही, तर प्रत्यक्ष किती अंमलबजावणी झाली याची तपासणी केली जाईल आणि कमी काम करणाऱ्या मंत्र्यांची कानउघाडणी केली जाणार आहे.

सुमार किंवा कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची (वगळले जाण्याची) दाट शक्यता आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल होण्याची चर्चा आहे. यामध्ये काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे