न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत विद्यमान नगराध्यक्षांना माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी उपनगराध्यक्षांच्या साथीने हरविले

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी शहरातील नगरपालिका राजकारणात बुध्दीबळाचे तंत्र वापरत एकमेकांना शह काटशह देणा-या धुरंधरानी आज  कॅरम स्पर्धेत विरोधी प्यादांशी बरोबरीने खेळून डाव जिंकला… होय संजू परब यांनी अनिल निरवडेकर यांच्या साथीने नगराध्यक्षा श्रध्दाराजे आणि नगरसेवक अजय गोंदावळे यांच्या जोडीला हरवले … निमित्त होते  नगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक  स्पर्धा २०२६’ चे …

पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी नगरपालिकेने आजपासून जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यांचे उद्घाटन राजेसाहेब खेम सावंत भोसले  आणि राणीसाहेब शुभदा देवी सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते.यावेळी यावेळी नगरपालिका सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे