न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ ची स्थापना

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरूवात होत असून ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ या नव्या क्लबचा स्थापना व पदग्रहण सोहळा रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजता, राणी पार्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृह, सावंतवाडी येथे होणार आहे. सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मये यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या क्लबची स्थापना होत आहे. चार्टर्ड प्रेसिडेंट सम्राट नरेंद्र देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ चा प्रवास सुरू होत आहे अशी माहिती सम्राट क्लब मये अध्यक्ष सम्राट नरेश पेडणेकर यांनी शुक्रवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’च्या चार्टड प्रेसिडेंटपदी सम्राट नरेंद्र देशपांडे यांची तर भावी अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पृथ्वीराज प्रताप, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार सुनिल राऊळ, संचालक स्मिता केंकरे, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, जनसंपर्क अधिकारी दादा मडकईकर, ऑडीटर कौस्तुभ पेडणेकर, प्रोग्राम डायरेक्टर ॲड. सिद्धी परब, संचालकपदी डॉ. सोनल लेले, गुरुप्रसाद चिटणीस यांची निवड करण्यात आली आहे. कला, संस्कृती आणि शिक्षण या तीन प्रमुख क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून विविध विधायक उपक्रम राबविण्याचा क्लबचा मानस आहे. स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देणे, या उद्दिष्टांसाठी क्लब कार्यरत राहणार आहे. या स्थापना सोहळ्यास सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत सावंत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सम्राट धर्मा व्ही. चोडणकर, इन्स्टॉलेशन ऑफिसर व डायरेक्टर क्लब एक्स्टेंशन, सम्राट क्लब इंटरनॅशनल, तसेच सम्राट शशिकांत पुनाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ च्या स्थापनेमुळे सावंतवाडीच्या कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला एक संघटित व सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध होणार असून या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विधायक उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नव्या क्लबच्या स्थापना सोहळ्यास सम्राट परिवारातील सर्व कलाकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या क्लबच्या वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सम्राट क्लब मये अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष अर्जून नाईक, नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, गुरुप्रसाद चिटणीस आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे