ब्रिटीशांपेक्षाही निर्दयी.. आंदोलनकर्त्या विद्यार्थी विद्यार्थिनींची डोकी फोडली.. अमानूष लाठीचार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी साठी जंतरमंतरवर सीजेपीच्या मोर्चावर पोलीसांनी लाठीमार केला. यात अनेकांची डोकी फुटली आहेत . अत्यंत निर्दयी वागणं सरकारकडून होत आहे.काही आंदोलकांवर पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचेही पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओनुसार पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. एका आंदोलकाला पोलिसांने ट्रकमधून खाली खेचल्याचे .याच पोलिसाने आंदोलकाला लाथांनी मारल्याचेही समजतं आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. एकीकडे आंदोलक संसद भवनाकडे मार्गक्रमण करत आहेत, तर दुसरीकडे पोलीस आंदोलकांना आडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी मोर्चाची धुरा सांभाळली. पैलीसांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी ट्रकवर चढले असता आंदोलकांनी ट्रकला वेढा दिला आहे.



