न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गाची संस्कृती आणि भाषा मला भावली; विल्सन प्रॉप

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

       सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती आणि भाषा मला फार भावली. ह्यो सिंधुदुर्ग जिल्हा आपलोच आसा, या जिल्ह्यावर प्रेम करावे असा हा जिल्हा आहे, अशा शब्दात केनियाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन की प्रॉप यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील आपले प्रेम व्यक्त केले.

केनिया देशाचे जगविख्यात धावपटू विल्सन की प्रॉप यांचे आज दुपारी कुडाळ येथे आगमन झाले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी श्री. विल्सन की प्रॉप बोलत होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश मसके, सचिव ॲड. संतोष सावंत, सहसचिव सुरेश पवार, प्रा. सुभाष गोवेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप वालावलकर, वृंदा कांबळी, प्रा. दिपाली काजरेकर, गोविंद पवार, स्वाती सावंत, ॲड. मंदार मसके उपस्थित होते.

याप्रसंगी विल्सन की प्रॉप व त्यांच्यासोबत आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि केनिया येथे स्थायिक झालेले मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारे अजित राणे यांचा सत्कार करण्यात आला.कोमसाप सिंधुदुर्ग तर्फे दोघांचा ही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आणि कोकणी संस्कृतीचा भगवा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रॉप म्हणाले, केनियामध्ये रनिंगला फार महत्त्व आहे आणि रनिंग हि केनियाची संस्कृती आहे. रनिंगचे महत्व व प्रसार करण्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे. लवकरच सिंधुदुर्गात रनिंग कॅम्प ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा माझा मानस आहे. असे ते म्हणाले.

केनिया येथे मे महिन्यात महाराष्ट्र मंडळ नेरोबी केनिया आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. या संमेलनात केनिया येथील महाराष्ट्र मंडळाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले होते. तेथे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. त्यामुळे केनिया देशाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन कि पॉप हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्याबद्दल त्यांचा सन्मान स्वागत करण्यात आले.

यावेळी अजित राणे म्हणाले, केनियामध्ये कोकणची संस्कृती आणि मराठी भाषा अधिक प्रगल्भतेने आम्ही राबवत आहोत. तेथे गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याप्रसंगी आम्ही जणू आमच्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहोत याचाच प्रत्यय येतो. तेथे दिवाळी, दसरा, होळी असे विविध सण आणि या कोकणची संस्कृती जपली जात आहे. आतापर्यंत कोकणातील अनेक मंडळींनी केनियामध्ये तेथील खाद्य संस्कृती आणि तेथील पर्यटन स्थळाचा आस्वाद घेतला आहे असे ते म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे