अभिनेता नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन
पणजी / प्रतिनिधी
जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे .वयाच्या ७५ व्या वर्षी घेतलं अखेरचा श्वास…१ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे जन्म झालेल्या नानांनी चित्रपट क्षेत्रासोबत सामाजिक कार्यातही सहभाग दर्शविला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ते गोव्यातील दोना पावला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नाना पाटेकर यांच्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून झाली. त्यांच्या अभिनयाची खरी जडणघडण मराठी रंगभूमीवरच झाली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली
1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र त्यानंतर आलेला 1989 चा ‘परिंदा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीसाठी मोठा टप्पा ठरला.”
चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘अण्णा’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नाना पाटेकर यांच्या दमदार संवादांनी आणि भूमिका साकारताना व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरण्याच्या त्यांच्या शैलीने त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. यानंतर ते आपल्या अभिनयाच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.”


