न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मळगाव येथे वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन

 

सिंधुदुर्ग  राजू तावडे 

     मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ व ‘उत्कृष्ट वाचक सन्मान २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता वाचन मंदिराच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. सचिन श्रीरंग धोपेश्वरकर, सावंतवाडी हे उपस्थित राहणार आहेत.

सन २०२५-२६ या वर्षभरात ग्रंथालयाच्या आजीव, साधारण आणि बाल वाचक गटातून सर्वाधिक वाचन करणाऱ्या वाचक सभासदांची उत्कृष्ट वाचक म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. वाचन संस्कृती वाढावी आणि वाचकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

या कार्यक्रमास सर्व ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी, हितचिंतक आणि ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे