बेरोजगारांना मुख्याधिका-यांचा दणका…. झोपलेले प्रशासन ऐन चतुर्थीत जागे झाले… सावंतवाडीत अतिक्रमण मोहीम हाती
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
नियम हे नियम असतात … ते मोडू नये हे खरे… आता जर हे नियम मोडले तर त्यांना शिक्षा होणेही योग्य… आता या परिमार्थाचे कारण म्हणजे सावंतवाडत काल (बुधवार) रात्री मुख्याधिकारी औंधकर साहेबांनी अचानक बाजारात जाऊन अतिक्रमण करणाऱ्यांना ते अतिक्रमण स्वतःहून हटवायचे फर्मान काढले आहे अन्यथा न.पा. दोन दिवसांत ते काढतील असा सज्जड दम भरला आहे.
सावंतवाडीत वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी याला नागरिक कंटाळलेत हे खरे… अतिक्रमण मोहीम राबविण्यात येतेय हेही योग्य… फक्त ऐन चतुर्थीत नको… असे सर्वांचे म्हणणे आहे…
हि अतिक्रमण होताना नगरपालिका प्रशासन झोपा काढत होते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहेच शिवाय झालीच तर त्यांना त्यावेळीच रोखणे महत्त्वाचे होते… आज रात्री ऐन चतुर्थीच्या तोंडावर असे करणे बाप्पालाही आवडणार नाही…
बापुसाहेब महाराजांच्या काळात रामराज्य होते.. आज त्यांच्याच चौथ्या पिढीच्या हातात शहराची सुत्रे असताना हे रामराज्य गरीबांच्या पोटावर पाय का देत आहे असा सवाल विचारला जात आहे.
सावंतवाडीत पार्कींग सुविधा नसतानाही बंगले , बिल्डिंग होत आहेत.त्याकडे मुख्याधिकारी, कधी बघणार? न.पा. कर घेते.. शासन गाड्यांचे कर.. मग शहरात पार्किंग सुविधा उपलब्ध करणे न.पा.चे काम आहे… तसे न करता… दुसरचं काय तरी करायचं…
सावंतवाडी शहरात पहायला गेल्यास ६०/७०टक्के हमखास अतिक्रमण आढळेल…त्यात राजकीय लोकांची ,धनाढांची असतील मग ती तोडणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे..ऐन चतुर्थीच्या काळात हे .करू नये


