पोरकट निर्णयामुळे सावंतवाडीची वाट लागली
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
सावंतवाडीत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि कामावर लक्ष नसल्याने ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्याचा फटका संस्थानकालीन बंद होऊन ते पाणी मुसळधार पावसामुळे डॉ. साईल यांच्या घरात घुसण्याची घटना घडली. यात सेवानिवृत्त शिक्षक आकेरकर(८१) यांना घराबाहेर पडता आले नाही. संबंधित घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा श्रध्दाराजे यांनी न.पा. कर्मचाऱ्यांकडून त्यांची सोडवणूक केली.
दरम्यान रस्त्ता खोदतानाच आपण कल्पना देऊनही मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केले आणि हा त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला. सावंतवाडीत ठेकेदार ऐन पावसाळ्यात काम अर्धवट सोडून गायब आहेत आणि प्रशासन खेकडे पकडण्यात तर नगराध्यक्षा मान्सून सावंतवाडी एन्जॉय करीत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. कारण पाऊस सुरू होणार हे माहीत असतानाही घाईघाईने खोदकाम केली गेली. त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते… एवढेच आजही काम सुरू आहेत.


