न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कारिवडे ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, सैनिक आणि पोलिसांचा सत्कार

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

 

ग्रामपंचायत कारिवडेच्या वतीने ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील गुणवंत विद्यार्थी, आजी-माजी सैनिक आणि पोलिस बांधवांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल कारिवडे गावातील जिल्हा परिषद शाळेतील ६० विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. तसेच देशाच्या आणि राज्याच्या सेवेसाठी योगदान देणाऱ्या कारिवडे गावातील सर्व आजी-माजी सैनिक, कार्यरत व निवृत्त पोलिस कर्मचारी आणि वीरपत्नी मिळून सुमारे ११० जणांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्राजक्ता केळुसकर (पंचायत समिती सदस्य), सौ. आरती अशोक माळकर (सरपंच, कारिवडे गाव), महेश गावकर (उपसरपंच), तुकाराम आमुणेकर (ग्रामपंचायत सदस्य), सौ. प्रतिभा जाधव (ग्रामपंचायत सदस्य), सौ.तन्वी साईल (ग्रामपंचायत सदस्य), श्रीम.भाग्यश्री भारमल (ग्रामपंचायत सदस्य), श्रीम. नेहा परब (ग्रामपंचायत सदस्य), श्री. शंकर मेस्त्री (अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती कारिवडे), श्री. अशोक माळकर (भाजपा उपाध्यक्ष, आंबोली मंडळ), माजी सरपंच श्री.तानाजी साईल, श्री. आत्माराम साईल (माजी सैनिक), श्री. लक्ष्मण सावंत (माजी सैनिक), श्री. संजय सावंत (माजी सैनिक), श्री. लक्ष्मण गवळी (माजी सैनिक), श्री. महादेव माळकर (चेअरमन, कारिवडे सोसायटी), श्री. रविंद्र ठाकुर (व्हाईस चेअरमन, कारिवडे सोसायटी),

श्री. सोनु सावंत (संचालक, कारिवडे सोसायटी), श्री.भरत बुंदे (ग्रामपंचायत अधिकारी), श्री.प्रदिप केळुसकर, पोलिस पाटील कारिवडे, सौ.श्रुती सिद्धेश गोसावी, भैरववाडी पोलिस पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध कवी मनोहर परब यांनी केले. आभार अशोक माळकर यांनी मानले. हा सोहळा कारिवडे गावकऱ्यांच्या देशप्रेमाची आणि एकतेची साक्ष देणारा ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे