न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली कराओके गायन स्पर्धा; सम्राट क्लब सावंतवाडी आणि सैनिक स्कूल आंबोलीचा उपक्रम

 

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

    या वर्षीच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित कराओके गायन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजता सावंतवाडी शहरातील माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्या श्री देव आत्मेश्वर मंदिर परिसर येथे होणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त गायक कलाकारांनी या कराओके गायन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सैनिक स्कूलचे प्रमुख व सैनिक पतसंस्थेचे सीईओ सुनील राऊळ आणि माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचे नंदू गावडे यांनी केले आहे.

सशुल्क खुली कराओके गायन या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख ₹३,३३३, द्वितीय क्रमांकास रोख ₹२,२२२ आणि तृतीय क्रमांकास रोख ₹१,१११ सह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. याशिवाय दोन स्पर्धकांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या गायनाचा १ मिनिटाची व्हिडिओ क्लिप सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या व्हॉट्सॲप नं.+९१-८४१९९६०४७० वर १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. प्राप्त क्लिप्समधून निवडक २० उत्कृष्ट गायक स्पर्धकांना मुख्य स्पर्धेत सादरीकरणाची संधी दिली जाईल.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस हे करणार आहेत.

तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सैनिक स्कूल आंबोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे