न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

निष्पापांचा जीव गेला… इराणच्या शाळेवर बॉम्ब हल्ला…४० विद्यार्थी ठार

तेहरान/
इस्रायल आणि अमेरिकेन इराण विरोधात संयुक्त लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईत इराणचं नुकसान झालं आहे. इराणची सरकारी एजन्सी IRNA च्या माहितीनुसार, दक्षिण इराणच्या होर्मोजगान प्रांतातील मिनाब शहरातील एका शाळेवर अमेरिका-इस्रायलनं हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ४० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी अमेरिकेनं जियोनिस्ट शासनाच्या साथीनं देशातील अनेक भागांवर हवाई हल्ले केल्याचा दावा इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं केला आहे. ‘या कारवाईंनी इराणी जनता दबावाखाली येईल, असं शत्रूला वाटतं. पण तसं काहीही होणार नाही. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांनी पलटवार सुरु केला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरेसा साठा देशाकडे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील. बँकांच्या सेवा सुरुच राहतील. सरकारी कार्यालयं ५० टक्के क्षमतेनं काम करतील,’ असं सुरक्षा परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.

अमेरिका आणि जियोनिस्ट शासनानं आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केलं आहे. आमच्या अनेक सुरक्षा तळांवर, केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं आहे. नागरी भागात हल्ले करण्यात आले आहेत, अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊनही इराणनं आंतरराष्ट्रीय समुदाय आणि विविध देशांशी संवाद साधण्याचा मार्ग निवडला. तणाव टाळण्याचा आमचा प्रयत्न होता, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. ‘युद्ध टाळण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. पण सद्यस्थितीत देशाची सुरक्षा करणं आणि शत्रूच्या हल्ल्याचा मुकाबला करणं अनिवार्य आहे,’ असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे