मूर्तीकार विलास मांजरेकर यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून अभिनंदन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
प्रसिद्ध मूर्तीकार विलास मांजरेकर यांना नुकताच ‘कोकण कलारत्न पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्री. विलास मांजरेकर यांची आज सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल परब यांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक गुरुदास मटकर उपस्थित होते.


