न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अजित पवार यांचे मराठा समाजासाठी मोठे योगदान ….अ. भा. मराठा समाज तर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बहुजन समाजाचे नेते होते. त्यांच्या जाण्याने आज बहुजन समाज पोरका झाला आहे. मराठा समाजाचे अजित पवार नेते होते. त्यांनी मराठा समाजासाठी मोठे योगदान आहे. शासनाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना शिक्षण उद्योग व्यवसायाला कशी गती देता येईल या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला. त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. आपला हक्काचा माणूस हरपला अशा शब्दात सावंतवाडी अखिल भारतीय मराठा समाज तर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात आज गुरुवारी उपमुख्यमंत्री व मराठा समाजाचे नेते अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनाबद्दल अखिल भारतीय मराठा समाज सावंतवाडी शाखेतर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दोन मिनिटे स्तब्ध पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सतीश बागवे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ट वक्ता होते. त्यांचे काम करण्याची धडाडी वाखाणण्याजोगी होती. त्यांच्यासारखा नेता आता होणे नाही.
जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड. संतोष सावंत म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण बहुजन समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी कधी जात पात धर्म पाहिला नाही. फक्त समाज सेवा करणे हा त्यांचा एकमेव उद्देश होता. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जनतेच्या सेवेसाठी ते कार्यरत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम करताना भरीव निधी उपलब्ध करून दिला. अजित पवार यांच्या स्मृती जागृत ठेवायच्या असतील तर अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे दरवर्षी उपक्रम ठेवण्यात यावेत हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे श्री. सावंत म्हणाले.
यावेळी विनय गायकवाड, पुंडलिक दळवी, तालुकाधक्ष अभिषेक सावंत, नगरसेवक देवेंद्र टेमकर, मायकल डिसोजा, मनोज घाटकर, श्री. सतीश बागवे, दिगंबर नाईक, धोंडी दळवी, बापू राऊळ, आनंद नाईक, शांताराम पारधी, मनीष गावडे आधी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे