न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सम्राट संगीत सितारा २०२६’ स्पर्धेची पहिली फेरी १० मे ला सावंतवाडीत … अध्यक्ष शशिकांत पुनाजी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सम्राट संगीत सितारा २०२६ या भव्य शास्त्रीय संगीत स्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी रविवार १० मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वा. सावंतवाडी येथील नगरपालिका सभागृहात घेण्यात येणार आहे. तर अंतिम फेरी जागतिक संगीत दिनी २१ जून रोजी कला अकादमी, पणजी गोवा येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ चे राज्य अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी आज शनिवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
शास्त्रीय संगीतातील नवोदित आणि हौशी गायक-गायिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ आणि सम्राट क्लब मये यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० व्या सम्राट संगीत सितारा’ या भव्य शास्त्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शास्त्रीय संगीताचा वारसा जोपासणाऱ्या या स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक २५,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक २०,००० रुपये व चषक, तृतीय क्रमांक १५,००० रुपये व चषक याव्यतिरिक्त तीन स्पर्धकांना प्रत्येकी ५,००० रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी विनामूल्य आहे. अर्जाची अंतिम मुदत ७ मे २०२६ पर्यंत आहे. नोंदणी ऑनलाईन (गुगल फॉर्म) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ पहिल्या २० पात्र अर्जांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
१५ ते २५ वयोगटातील हौशी कलाकारांसाठी ही स्पर्धा असून व्यावसायिक गायकांना यात सहभागी होता येणार नाही. स्पर्धेची भाषा हिंदी किंवा ब्रिज असेल. उपांत्य फेरीसाठी एकूण १२ स्पर्धकांची निवड केली जाईल, ज्यातून ६ जण अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धकांसाठी तबला आणि हार्मोनियमची साथसंगत आयोजकांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. सावंतवाडी येथे होणारी प्राथमिक फेरी सर्व संगीतप्रेमींसाठी खुली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. पुनाजी यांनी केले आहे.
दिनांक १० मे रोजी प्राथमिक फेरी सावंतवाडी येथे, दि. २४ मे रोजी रवींद्र सभागृह मडगाव येथे, दि. ३० मे रोजी झांट्ये सभागृह डिचोली येथे, दि. ७ जून रोजी बेळगाव येथे पुढील फेऱ्या होणार आहेत. उपांत्य फेरी १४ जून रोजी ब्लॅक बॉक्स कला अकादमी पणजी येथे होणार असून २१ जूनला जागतिक संगीत दिनी अंतिम फेरी होऊन विजेते घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सम्राट संगीत सिताराचे चेअरमन महेश गांवकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी नरेश (९५११७५८८३६), सम्राट मंगेश (९८३४७५५१७८) आणि सम्राट सज्जन (७८७५२४१०४१) यांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. यावेळी सम्राट सम्राट क्लब मये अध्यक्ष नरेश पेडणेकर, सम्राट संगीत सितारा चेअरमन मंगेश गांवकर, खजिनदार सपना परब- मातोंडकर, साखळीचे अध्यक्ष उद्योजक चेतन सालेलकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे