न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनच्या अधिवेशनाची जय्यत तयारी 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दि.२३ मे व २४ मे रोजी आंबोली येथे होणाऱ्या दोन दिवसाच्या पतसंस्थांच्या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांचा एकोपा अधिक वाढावा, कामकाजात एकसुत्रीपणा यावा, सर्वच पतसंस्थांनी एकमेकांना सहाय्यभूत राहून काम करावे, व भविष्यात स्पर्धात्मक आव्हानांना अधिक प्रखरपणे तोंड देता यावे या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केलेले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील पतसंस्थांची बैठक नुकतीच घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या या पतसंस्थांच्या पहिल्या अधिवेशनात सर्व पतसंस्था उस्फुर्तपणे सहभाग दर्शवत आहेत. पतसंस्थांचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अनेक पतसंस्थांनी आर्थिक स्वरुपातसुद्धा विविध पातळीवर हातभार लावण्याचे काम सुरु केलेले आहे. त्याबद्दल अध्यक्ष श्री. राऊळ यांनी आभार व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक पतसंस्थांनी विविध ठिकाणी रोडवर स्वागताच्या कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातून पतसंस्था चळवळीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे काम करणाऱ्या अनेक पतसंस्थांना गौरविण्यात येणार असून त्यांना गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, व शाल व श्रीफळ देऊन त्याठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच सहभागी प्रतिनिधीना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर अधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. निलेश राणे व आमदार दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, जिल्हाधिकारी , विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकणभवन, श्री. सोपान शिंदे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग या सर्व मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातून राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी, कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी दिली.

यावेळी फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री. जॉय डॉन्टस, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव कविटकर, सावंतवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश बोंद्रे, वैश्यसमाज पतसंस्थेचे संचालक ॲड. समिर वंजारी, पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक श्री. महेश्वर कुंभार तसेच वि‌द्यासेवक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. काकतकर व कृषी कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल टेमकर, कॅथॉलिक पतसंस्थेचे श्री. एवरेस्ट मेडीस, श्री. जेम्स फर्नाडीस, व्यापारी पतसंस्थेचे श्री. गंगाराम सावंत, सावंतवाडी पतपेढीचे श्री. नारायण तेंडोलकर, स्नेहनागरी पतसंस्थेच्या सौ. संगीता प्रभू, भवानी पतसंस्थेचे श्री. भिकाजी गवस, पंचद्रविड ब्राह्मण पतसंस्थेच्या सौ. तृप्ती बखले, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे श्री. विनय आंदुर्लेकर, उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे