न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

झुकुंगा नही …. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत… सरकार आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांना आर्थिक मदत देण्याच्या तयारीत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष ही मैदानात उतरले आहेत. NEET पेपरलीक प्रकरणी चौकशी आणि दोषींना शिक्षा देण्याची तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी रेटली आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात भर पावसात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचे लोण आता देशभरात पोहचले आहे. पण मोदी सरकार प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या तयारीत नाही. त्याऐवजी सरकारने मोठा प्रस्ताव ठेवला आहे.

केंद्र सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलकांशी चर्चा करण्यास तयार आहे. पण जंतरमंतरवरच चर्चा करा ही अट सरकारला मान्य नाही. त्याऐवजी दुसरे ठिकाण निश्चित करण्याचा सरकारचा आग्रह आहे, असे एका अधिकाऱ्याने PTI या वृत्तसंस्थेला सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थित सरकारचेही बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदे जे. पी. नड्डा यांनी संसदेत कथित नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी चर्चेस तयारी दर्शवली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यास सरकार तयार नाही. तर त्याऐवजी पीडित कुटुंबियांना भरपाई देण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे