न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नृसिंहवाडीत ‘दक्षिण द्वार’ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कोल्हापूर/ वृत्तसंस्था

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीने यंदाही पात्र सोडल्याने आज मंगळवारी (ता. ७) पहाटे पारंपरिक ‘दक्षिण द्वार’ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
काल सायंकाळपासूनच कृष्णा नदीचे पाणी मंदिर परिसरात शिरू लागले होते. रात्रभर पाणीपातळीत सातत्याने वाढ झाल्याने दत्तभक्तांमध्ये दक्षिण द्वार सोहळ्याची उत्सुकता वाढली होती. पहाटे हा धार्मिक सोहळा पार पडताच पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

दक्षिण द्वार सोहळ्याची माहिती परिसरात पसरताच सांगली, कोल्हापूर, शिरोळ, इचलकरंजी तसेच आसपासच्या भागांतून हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या असून ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

भाविकांची वाढती गर्दी आणि नदीच्या वाढत्या पाण्याचा विचार करून श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.पू. श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने धार्मिक वातावरण अधिक खुलून दिसत आहे. वाढते नदीपात्र, भाविकांची सुरक्षितता आणि सुरळीत दर्शन व्यवस्था या तिन्ही बाबींवर मंदिर प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे