खानापूर-अनमोड मार्गावरील हालात्री नाल्याच्या पूलावर पाणी
बेळगांवी/ गजानन बांदेकर
खानापूर तालुक्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार कायम असून नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने लोक धास्तावले आहेत. सखल भागातील शेती पाण्याखाली गेली असून पश्चिम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अविश्रांत कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे खानापूर-अनमोड मार्गावरील हालात्री नाल्याच्या पूलावर पाणी आले आहे. मंगळवारी सकाळी या पुलावरुन पाण्याचा प्रवाह वाहत होता.
गोव्याला जाण्याशी खानापूर-हेमाडगा-अनमोड मार्गाचा अवलंब करतात. संततधारेत वाढ झाल्याने हा पूल पाण्याखाली तर हेमाडगा, शिरोली भागाचा संपर्क तुटला जाण्याची शक्यता आहे.
खानापूर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मणतुर्गा गावाजवळून वाहणाऱ्या हालात्री नदीवरील पुलावर पाणी आलयं. पाणी पातळीत सातत्याने वाढ होऊन धोका टाळण्यासाठी खानापूर पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीला बंद करावा अशी मागणी होत आहे”


