न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ओटवणे पं. स. मतदार संघातून सौ उत्कर्षा गावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिंधुदुर्ग/ / राजू तावडे 

ओटवणे पंचायत समिती मतदार संघातून शिवसेनेमार्फत ओटवणे गावच्या माजी सरपंच सौ उत्कर्षा उमेश गावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत दाखल केला. सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्हि एम नाईक यांच्याकडे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, चराटे सरपंच प्रचिती कुबल, माजी सरपंच बाळू वाळके, सरमळे शिवसेना शाखाप्रमुख संजय गावडे, ओटवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, गुंडू जाधव, रमेश गावकर आदींसह ओटवणे, सरमळे, चराठा गावातील शिवसेना कार्यकर्ते तसेच महिला व ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे