पोलीसाच्याच दुचाकीतून चार लाखांची चोरी
धाराशिव/
धाराशिवच्या वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अर्जुन मार्कड यांची चार लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना भूम शहरात घडली आहे.चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दुचाकी पंचर करून तसेच दिशाभूल करत गाडीत ठेवलेली रोकड लंपास केली.ही संपुर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अर्जुन मार्कड यांनी भारतीय स्टेट बँकेत सोनेतारण करून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.


