न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चे उद्घाटन

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 ‌ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026’ चे उद्घाटन दीप प्रज्वलन करून सकाळी 8 वाजता पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला. यावेळी बांदा ग्रामपंचायत सरपंच श्रीमती प्रियांका नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देणे अनिवार्य आहे. कोणत्याही बालके पोलिओ डोस पासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. प्राथमिक केंद्र अंतर्गत एकूण २५ बूथ,२ मोबाईल टीम, १ ट्रांजिस्ट टीम असे नियोजन असून एकूण ९५७ लाभार्थ्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्यांना पोलिओचे डोस देऊन त्यांना सुरक्षित करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्यातर्फे पोलिओ डोस लाभार्थी बालकांना खाऊवाटप करण्यात आले

डॉ. रमेश कर्तस्कर ,तालुका आरोग्य अधिकारी सावंतवाडी व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन सारंग , डॉ. कुबल प्राथमिक केंद्र निरवडे श्री. आर. आ.र ठाकूर , जिल्हा पर्यवेक्षक श्री .शंकर परब ,तालुका पर्यवेक्षक श्री. अरुण गवस, तालुका आरोग्य कार्यालय प्रतिनिधी श्री. एस. एस. वेटे, आरोग्य सहाय्यक श्रीम.तेजस्वीनी माजगांवकर , समुदाय आरोग्य् अधिकारी मडूरा श्री. दिनेश देसाई, कनिष्ठ सहाय्यक, श्रीम. मृणाली कदम, आरोग्य सेविका व श्रीम. अर्चना गोन्साल्विस, एन.सी.डी. स्टाफ नर्स व इतर प्रा. आ. केंद्रातीलf कर्मचारी, आशा स्वयंसेविका, लाभार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

या मोहिमेत आशा स्वयंसेविका मोलाची भूमिका बजावत आहेत. या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन बांदा परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना लवकरात लवकर पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. कामत यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे