पुजा वडाची करीतो आम्ही सावित्रीच्या लेकी.…
रत्नागिरी/पणजी :
महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात यांसारख्या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांद्वारे अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे。 हा सण हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो。 या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि वैवाहिक जीवनात अखंड सौभाग्य लाभो, यासाठी वटवृक्षाची (वड) मनोभावे पूजा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत वटसावित्रीचे एकमेव मंदिर आहे.
पौराणिक कथा आणि महत्त्ववटपौर्णिमेचे व्रत महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे。 सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि व्रत केले होते。 वटवृक्ष हे दीर्घायुष्य, स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, कारण या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असल्याचे मानले जाते
पूजेच्या ताटात भिजवलेले हरभरे (डाळ), तांदूळ, फळे (आंबा, केळी, फणस), फुले, कापूर, हळद-कुंकू, आणि सूती धागा किंवा कच्चा पांढरा दोरा ठेवला गेला होता.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पुरूषांनी वडाला फेरा घेत अनोखी वटपौर्णिमा साजरी केली. हे त्यांचे १७ वे वर्ष आहे.


