न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाशिवरात्रीनिमित्त श्री नागनाथ मंदिरात विशाल परब यांनी घेतले दर्शन

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी श्री नागनाथाच्या चरणी लीन होऊन जनसेवेसाठी आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. देवस्थान कमिटीने केलेल्या उत्तम नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, पंचायत समिती सदस्य संजय साताडेकर, पंचायत समिती सदस्य सोनिया नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, शहराध्यक्ष राजेश फुलारी, तसेच उपाध्यक्ष आनंद तळणकर , चेतन आजगावकर, शिरिष नाईक, समीर लोंढे, प्रेमानंद देसाई, वैभव सुतार यांसह देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवू गवस, जयराज गवस, प्रदिप गवस, आणि सुनिल गवस आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे