न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दोडामार्गला स्वतंत्र सबस्टेशन द्या, अन्यथा आंदोलन ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांचा इशारा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

दोडामार्ग शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर करून त्याचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत शासनाकडे पाठविण्यात आला नाही, तर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिला. तसेच गोवा-दोडामार्ग सीमावर्ती भागातील किमान पाच ग्रामपंचायतींना प्रायोगिक तत्त्वावर गोवा राज्यातून सुमारे १ रुपये ९० पैसे दराने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी लवकरच गोव्याच्या वीजमंत्र्यांची भेट घेणार असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
कसई-दोडामार्ग नगरपंचायत सभागृहात आयोजित वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना व नगरपंचायत यांच्या संयुक्त बैठकीत वीज ग्राहकांच्या विविध समस्या आणि महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत पिकुळे गावातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून तातडीने वीज क्षमतेत वाढ करावी तसेच अतिरिक्त वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मांगेली-कुसगेवाडी येथील वायरमन नागेश पांडुरंग गवस यांच्या मृत्यूनंतर तब्बल एक वर्ष उलटूनही कुटुंबाला नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यावर अभियंता हतरंगी यांनी संबंधित कुटुंबाला एका महिन्याच्या आत नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.
दोडामार्ग तालुक्यात सातत्याने होणाऱ्या वीज खंडित प्रकारांमुळे नागरिक त्रस्त असून, विशेष बाब म्हणून अतिरिक्त निधी मंजूर करून वीज यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी नंदन वेंगुर्लेकर यांनी केली. तर साटेली-भेडशी दशक्रोशीतील वीज कार्यालय प्रभावीपणे चालविणे शक्य नसेल, तर ते कार्यालय बंद करावे; अन्यथा नागरिकांच्या वतीने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी यांनी दिला.
औया बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, अभियंता हतरंगी, दोडामार्ग वीज ग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, व्यापारी संघटना अध्यक्ष सागर शिरसाट, उभादांडा जिल्हा परिषद सदस्य व वीज ग्राहक संघटना वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, मोरगाव सरपंच आईर, कळणे सरपंच अजित देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संजय गवस, तिलकांचन गवस, गणपत डांगी, आशीर्वाद मणेरीकर, तानाजी डांगी, सुदेश मळीक, हनुमंत गवस, दिलखुश देसाई, अंकुश उर्फ भैया नाईक यांच्यासह दोडामार्ग, पिकुळे, आयी, मांगेली, आयी व परिसरातील मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे