कणकवली आणि कुडाळ रेल्वेस्टेशनवर लिफ्ट…
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कोंकण रेल्वे मार्गावरील कणकवली आणि कुडाळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन वर लिफ्ट बांधण्यात येणार असून त्याचे टेंडर ही निघाले आहे. या आधी कणकवली येथे सरकता जीना बांधण्यात आला आहे तर सावंतवाडीत लिफ्ट काम सुरू आहे.. आता या दोन स्थानकात लिफ्टची सोय होणार आहे .



