न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगाव मंदिर २४ तास खुले

बुलढाणा/ सचिन व्यवहारे 

संत गजानन महाराजांच्या १४८व्या प्रगट दिनानिमित्त शेगावात भक्तीचा महासागर उसळणार आहे. प्रगट दिनाचे औचित्य साधत, शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर आज आणि उद्या सलग २४ तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतला आहे.

यामुळे राज्यासह देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल होत असून, आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संपूर्ण नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे… दरम्यान, ८ तारखेला प्रगट दिन असल्याने होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, शांततेत व भक्तिभावात प्रगट दिन साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे