इथे तर दहिहंडी फोडताना चक्क विहिरीत पडतात
रायगड / वृत्तसंस्था
रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावात दहीहंडी फोडण्याची पद्धत अत्यंत अनोखी आहे. इथे ना मानवी मनोरे, ना उंच क्रेन… तर थेट विहिरीच्या कठड्यावरून उडी मारत दहीहंडी फोडली जाते.
तब्बल ३३ वर्षांपासून ही थरारक परंपरा कुर्डूस गावात सुरू आहे. १९९२ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते.विहिरीच्या मधोमध बांधलेल्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी गोविंदा कठड्यावरून उडी घेतात आणि हंडी फोडता अनेकदा गोविंदा थेट विहिरीच्या पाण्यात पडतात.दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी रायगडसह मुंबई, पुणे आणि इतर भागांतूनही नागरिकांची गर्दी होते.


