न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत महिलेचा दागिना खेचून पळालेले दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    सावंतवाडीत काही दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना खेचून पळून गेलेल्या दोन अट्टल चोरट्यांना सावंतवाडी पोलिसांनी कोल्हापूर कारागृहातून ताब्यात घेतले आहे. त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वैभव नारायणराव अडोळे (वय २६, मूळ रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, मूळ रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला सोन्याचा दागिना हस्तगत केला आहे. दिनांक१० जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथील रहिवासी रंजना ठाकूर या रस्त्यावरून चालत जात असताना, दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने खेचून मोटारसायकलवरून पलायन केले होते. या घटनेनंतर काही दिवसांतच कोल्हापूर परिसरातही अशाच प्रकारचा गुन्हा घडला होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. तेथील पोलीस तपासादरम्यान आरोपींनी सावंतवाडीतील गुन्ह्याची कबुली दिली होती. सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपींना कोल्हापूर कारागृहातून ताब्यात घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे