न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वटपौर्णिमा… नव-याचे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी पत्नीने बांधल्या वडाला दारूच्या बाटल्या

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)/

होय छत्रपती संभाजीनगरमध्ये वटसावित्रीचा हा अनोखा प्रकार खरंच लक्ष वेधून घेतोय.

पारंपरिक वटसावित्री पूजेत महिला नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाला प्रदक्षिणा घालतात, प्रार्थना करतात. पण इथे एका महिलेनं नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटावं म्हणून थेट वडाच्या झाडालाच दारूच्या बाटल्या लटकवल्या.

सामान्यतः वडाला धागा गुंडाळून, फळं-फुलं वाहून नवऱ्याच्या उत्तम आरोग्याचं वरदान मागितलं जातं. या महिलेनं मात्र प्रतीकात्मकपणे ‘दारूचाच त्याग’ वडाला अर्पण केला. व्यसन हेही आरोग्यासाठी धोकादायकच, त्यामुळे तिनं व्रताचा गाभा तसाच ठेवून पद्धत बदलली.

ही बातमी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. श्रद्धा आणि सामाजिक समस्येला जोडणारा हा प्रकार अनेकांना भावला.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे