न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान

 

सिंधुदुर्ग। राजू तावडे 

सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर – येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कला आंगण महोत्सव २०२६’ मध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या शुभहस्ते वृषाली रेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री. चेतन गंगावणे तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृषाली रेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तश कोकणचे सौंदर्य आणि वैभव जगभर पोहोचवले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांची, समाजहितैषी कार्याची आणि नवदृष्टिकोनाची दखल घेऊनच हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान करताना पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले की, “वृषाली रेडकर यांनी आपल्या कार्यातून कोकणच्या वैभवात मौल्यवान भर टाकली आहे. त्यांच्यासारख्या तरुण पिढीमुळेच आपली संस्कृती आणि कला टिकून आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे