न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगेली गावातील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

  सांगेली गावातील गेली अनेक दिवस रखडलेल्या श्री सातेरी मातेच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाल्याने सांगेली ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांनी सांगेली ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने शब्दाला जागणारे नेतृत्व आणि विकासासाठी कटिबद्ध असणारा कार्यकर्ता ही श्री. संजू परब यांची खरी ठरली आहे.

श्री सातेरी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या असंख्य भाविकांना तसेच ग्रामस्थांना या रस्त्याचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे. अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने सर्वांच्या मनात समाधान आहे.

या महत्त्वपूर्ण कामासाठी पुढाकार घेणारे आमदार श्री. दीपक केसरकर आणि आपला शब्द पाळून रस्त्याच्या कामाला सुरुवात करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब या दोघांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे