न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वाशिम मध्ये ९ पोलीसांना जन्मठेपेची शिक्षा

वाशिम / वृत्तसंस्था

वाशिममधील ९ पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी कस्टडीमध्ये असलेल्या आरोपीला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोषी असलेल्या ९ पोलिसांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. सर्वच्या सर्व पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला.”
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. रिसोड पोलिस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. बेग्या पवार याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची त्याच्या आई-वडिलांची माहिती आहे. बेग्या पवार हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी समाजाचा होता. त्यांचा १० मे २०११ रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. तब्ब्ल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला”

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे