न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नगरपरिषदेतील गैरकारभारा विरोधात नगरसेवक देव्या सुर्याजींचे उपोषण 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

         आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या ओपीडी संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून झालेली दिरंगाई, ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामात कसूर केलेल्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा. पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांचे तात्काळ निलंबन करावे. नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी आदी मागण्यांसाठी नगरसेवक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन छेडले.

श्री. सुर्याजी म्हणाले, नळपाणी योजनेच काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. या प्रकरणी चौकटीसाठी जिल्हाधिकारी आलेल्या असताना आम्हाला बोलवले नाही. जनतेच्या प्रश्नांना नगरपरिषद न्याय देत नसून आयुष मंत्रालय भारत सरकारची ओपीडी आज सुरु होण आवश्यक होती. पण ती अद्याप पर्यंत सुरू झालेली नाही. याबाबतचा ठराव देखील सर्वानुमते मंजूर झाला आहे. ३ महिने कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नसून मुख्याधिकाऱ्यांकडून याला विरोध होत असल्याचे समजते. लोकांना येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार होत असताना त्यावर लक्ष नाही. या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लाच घेताना त्यांना पकडले असून अशी व्यक्ती संस्थानकालीन पवित्र न.प.च्या खुर्चीत आणून बसवली आहे‌. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी. पाणी पुरवठा विभागात झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी. अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषदेचे काम बोगस पद्धतीने सुरु असून त्यामुळे ही परिस्थिती आली आहे. महायुतीत असलो तरी जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे. लोकांचे प्रश्न नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी सभागृहात मांडून देखील त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आज आंदोलना बसावे लागले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शहरात होणारी दुरावस्था ही नळपाणी योजना, गॅस कंपनीकडून केलेल्या कामामुळे असून प्रशासन हाकण्यात सत्ताधारी कमी पडत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले.

आंदोलना दरम्यान माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांनी भेट दिली. तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी देखील आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांना समोर बोलावून घ्या, लेखी स्वरूपात म्हणणे द्या, त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याबाबतचा विचार करू असे स्पष्ट केले. दुपारपर्यंत मुख्याधिकारी न आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पत्र घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. मुख्याधिकारी नाही, प्रशासकीय अधिकारी नाहीत. मग, कारभार हाकतय कोण असा सवाल उपस्थितांनी केला. तसेच जोवर मुख्याधिकारी येत नाही तोवर हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या आंदोलनाला सावंतवाडीतील विविध पक्षातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी आंदोलनकर्ते नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड‌. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर, समीर वंजारी, राजू मसुरकर, रमेश सुर्याजी, विनोद सावंत, बाबल्या दुभाषी, अनिकेत पाटणकर, प्रथमेश प्रभू, दिग्विजय मुरगोड, ज्ञानेश्वर सावंत, देवेश पडते, संकल्प धारगळकर आदींसह सावंतवाडीतील नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे