न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रेडकर कुटुंबीयांकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला रुग्णपयोगी वस्तूंची भेट 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे.

 

समाजामध्ये सामाजिक जाणीव असलेल्या दानशूर व्यक्ती गोरगरीब रुग्णांना त्यांच्या आजारपणामध्ये उपयोग होण्यासाठी सामाजिक बांधिल प्रतिष्ठानला अशा वस्तू दान करत आहेत. आज संस्थेच्या निरंतर चाललेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती चित्तरंजन नाईक रेडकर व देवेंद्र नाईक रेडकर यांनी त्यांची आई कै.प्रतिभा प्रमोद रेडकर नाईक यांच्या स्मरणार्थ fowler bed व त्यावरील गादी तसेच , व्हीलचेअर कमोड चेअर, वॉकर अशा रुग्णपयोग्य वस्तू संस्थेला दान केल्या. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी नाईक रेडकर कुटुंबीयांचे आभार मानले. याप्रसंगी सदर रुग्णपयोगी वस्तू स्वीकारताना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे