न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तुकाराम महाराज कि जय…. आता भंडारा, महाप्रसादासाठीही परवानगी आवश्यक

मुंबई / वृत्तसंस्था

भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा विचार करत असाल तर थांबा. तुमच्याकडे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी आहे का ? नसेल तर तुमच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होऊ शकते. कारण राज्यातील भंडारा आणि महाप्रसाद कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाने नोंदणी बंधनकारक केली आहे.

“जर विनापरवाना असे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित आयोजकांवर थेट कायदेशीर कारवाई होणार असून, गरज पडल्यास गुन्हाही दाखल केला जाईल. अन्नातून विषबाधा होण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी आणि अन्न सुरक्षा तसेच स्वच्छता मानके राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.”

श्रावणापासून दिवाळीपर्यंत सण-समारंभांचा उत्सव सुरू असतो. या काळात कोल्हापूर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद आणि जेवणावळींचे आयोजन केले जाते. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे आता बंधनकारक असणार आहे. अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आयोजकांनी स्वच्छ व निर्जंतुक पाण्याचा वापर, स्वच्छ भांडी आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, तसेच मुदतबाह्य आणि नाशवंत पदार्थांचा वापर टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केलंय.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे