मुंबई गोवा महामार्गाची मलाच लाज वाटते… नितीन गडकरी
पणजी/ वृत्तसंस्था
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा गेली काही वर्षं चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गाचे काम गेले 16 ते 17 वर्षे रडतखडत सुरु आहे, या महामार्गाला खूप वेळ लागला हे माझं दुर्भाग्य आहे, अशी खंत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार-अधिकारी यांच्याविषयी जाहीरपणे नाराजी मांडली आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. एवढंच नाही, तर इतका उशीर झाल्याची मला लाज वाटते, त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटनाला आता मी येणार नाही, असे यापूर्वीच जाहीर केले होते, त्याचा पुनरुच्चार नितीन गडकरी यांनी केला आहे.


