न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अवघड दिवे घाट पार करून माऊली सासवड मुक्कामी पोहचली

पुणे/ संतोष मुळीक 

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. पुणेकरांनी मोठ्या भक्तीभावाने दोन्ही पालख्यांना निरोप दिला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने अवघड दिवे घाट लिलया पार केला आहे.दोन दिवस माऊलींचा मुक्काम सासवड नगरीत आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय टेक्नॉलॉजीचा वापर पोलिसांकडून होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक श्रीजी श्रीधर यांनी पंढरपुरात येऊन सर्व तंत्रज्ञानाची व एआय ड्रोनची माहिती घेऊन तपासणी केली. तसेच पोलिसांच्या इंटिग्रेटेड कंट्रोल रूमची देखील पाहणी करत आषाढी वारीमध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानाचा पोलिसांच्या मदतीसाठी असणारा वापर याबाबतची माहिती करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

दरम्यान पुणे-सासवड मार्गावरील वडकी परिसरात सूर्याभोवती मोठे कडे असल्याचे दृश्य अनेक वारकरी आणि नागरिकांनी पाहिले. या अनोख्या दृश्यामुळे काही काळ परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. हे दृश्य पाहण्यासाठी वारकऱ्यांची पाऊले थांबली. अनेकांनी या घटनेचे छायाचित्रण आणि व्हिडीओही केले.मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते ही कोणतीही अद्भुत किंवा अपशकुनाची घटना नसून “सोलर हॅलो”  म्हणून ओळखली जाणारी एक नैसर्गिक वातावरणीय घटना आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे