न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महिलांच्या “फुगडी कलेला” स्वतंत्र मानधन मिळावे….. लावण्यसिंधू लोककला संस्थेच्या वार्षिक सभेत मागणी 

 

 सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या “फुगडी कलेला” स्वतंत्र मानधन मिळावे व फाग, घुमट वादन व राधाकृष्ण नृत्य या लोककलांचा समावेश शासन निर्णयात करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्याचे लावण्यसिंधू लोककला संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले.

लावण्यसिंधू लोककला व चित्रपट निर्मिती सहकारी संस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कणकवली येथील श्री भवानी सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, उपाध्यक्षा सौ. अक्षता कांबळी, सचिव श्री. नितीन तळेकर, कार्यकारी संचालक श्री.राजू तावडे, श्री.गिरीश उपरकर हे उपस्थित होते.

कोकणात विशेषतः गणेशोत्सवामध्ये परंपरागत गौरी सणात महिलांच्या फुगडी कलेला एक आगळे वेगळे स्थान आहे. शासनाने राज्य शासनाच्या कलाकार मानधन योजनेमध्ये “फुगडी गटासाठी आणि व्यक्तिगत फुगडी कलाकारांसाठी “स्वतंत्र मानधन योजना निर्माण करावी अशी मागणी लावण्यसिंधू लोककला व चित्रपट निर्मिती सहकारी संस्था सिंधुदुर्ग तर्फे शासनाकडे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांचे सचिव नितीन तळेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या सभेत दि. ३१ मार्च २०२६ अखेरील आर्थिक वर्षातील जमा -खर्च, नफा – तोटा पत्रक व ताळेबंद पत्र वाचून त्यावर चर्चा होऊन मंजूर करण्यात आले.

तसेच कोकणातील पारंपारीक फुगडी व होळी सणातील घुमटवादन, फाग, व राधानृत्य लोककलांचा समावेश शासन निर्णयात व्हावा. त्यांना मानधन मिळावे आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील मानधन कलाकारांच्या संख्येची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, नवीन कलाकारांना संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेणे. कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे इत्यादी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे