न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीला ४ वर्षांनंतर मिळाला कायमस्वरूपी फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या चार वर्षांनंतर फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी यांची नियुक्ती झाली आहे. आज मंगळवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार आणि गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. विशाल रेड्डी यांचे स्वागत सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे उपस्थित होते.
डॉ. अभिजीत चितारी यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. यासाठी रुग्ण कल्याण समिती, सावंतवाडी नागरिक कृती समिती आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता. या नियुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती झाली आहे.
या जिल्ह उपरुग्णालयात काही काळ फिजिशियन नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वखर्चातून खाजगी फिजिशियनची नियुक्ती केली होती. सुमारे चार महिने त्यांनी ही सेवा सुरू ठेवून रुग्णांना आधार दिला होता. या प्रक्रियेत ॲड. अनिल निरवडेकर यांचाही मोलाचा सहभाग होता. या नियुक्तीबद्दल संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
डॉ. विशाल रेड्डी यांच्या नियुक्तीमुळे गरीब रुग्णांचा खाजगी रुग्णालयातील मोठा खर्च वाचणार आहे.”सावंतवाडीकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या एकजुटीच्या लढ्याला यश आले असून, आता रुग्णांना उपचारासाठी परराज्यात धाव घेण्याची गरज भासणार नाही.” अशी प्रतिक्रिया यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे