न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एक संवेदनशील कलाकार आणि अस्सल माणूस गमावला, विशाल परब 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   आपल्या अभिनयाच्या सामर्थ्याने असंख्य भूमिका अजरामर करणारे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या कसदार अभिनयाची छाप उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण कला-सृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील कलाकार, उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अस्सल माणूस गमावल्याची भावना भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली आणि तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

“नाना पाटेकर यांचे जाणे म्हणजे केवळ एका महान अभिनेत्याचे जाणे नाही; तर अभिनयाच्या विश्वातील एका तेजस्वी पर्वाचा अस्त होणे आहे. त्यांच्या आवाजातील धार, संवादातील ताकद, भूमिकेतील जीवंतपणा आणि माणुसकीशी असलेली त्यांची नाळ कायमच मनाला भिडणारी होती. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली.”

“नाना पडद्यावर भूमिका साकारत नव्हते, ते त्या भूमिकेला अक्षरशः जगत होते. त्यांच्या अभिनयातून कधी संघर्ष दिसला, कधी वेदना जाणवल्या, कधी संतापाची धग जाणवली, तर कधी माणुसकीचा ओलावा अनुभवायला मिळाला. त्यामुळेच नाना पाटेकर हे नाव केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित राहिले नाही; ते प्रत्येक रसिकाच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग बनले.”

“नानांचा आवाज आता प्रत्यक्ष ऐकू येणार नसला, तरी त्यांच्या भूमिका, त्यांचे संवाद आणि त्यांच्या अभिनयाची जादू असंख्य पिढ्यांच्या स्मरणात कायम घुमत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. नाना पाटेकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे,” अशा शब्दांत विशाल परब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

[08/10, 10:23 pm] Raju Tawde: सिंधुदुर्गातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर तात्काळ बंदी घाला : डॉ. जयेंद्र परुळेकर

 

सावंतवाडी/ राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने मारलेल्या ओढीमुळे आगामी काळात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात आणि जिल्ह्यातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर पुढील पावसाळ्यापर्यंत तात्काळ बंदी घालून ते पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत गुरुवारी केली.

सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर डॉ. परुळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक देवेंद्र टेमकर, चंद्रकांत गावडे, शहर संघटक निशांत तोरस्कर, उपाध्यक्ष अशोक धुरी आणि जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. परुळेकर पुढे म्हणाले की, जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात पाणीटंचाईचे उग्र रूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तात्काळ निधी मंजूर करावा, मनरेगा मार्फत कामे सुरू करावीत तसेच वनराई व कच्चे बंधारे बांधण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. सध्या लोकसहभागातून बंधारे बांधले जात असले तरी यात शासकीय पातळीवर उदासीनता दिसून येत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला असताना केवळ सिंधुदुर्गातच पावसाचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात झालेली बेसुमार वृक्षतोड याला कारणीभूत असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याबाबत आत्मपरीक्षण करून वृक्षतोड तात्काळ थांबवावी.

यावेळी त्यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार निशाणा साधला. देशभरात बोगस निवडणुका, पेपरफुटीचे प्रकार आणि स्पर्धा परीक्षांमधील घोळ यामुळे जनता व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर संशय निर्माण झाला असून पारदर्शकतेसाठी देशात फेरनिवडणुकीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ९०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीत मोठे काळे धंदे व जमीन घोटाळे सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून यात समाविष्ट असलेल्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे