न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुसळधार पावसाचा मंदीराला फटका

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडीत तालुक्यातील शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा समोरचा दर्शनी भाग आज गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कोसळला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंदिराच्या जुन्या बांधकामाला धोका निर्माण झाला होता. आज दुपारी पावसाचा जोर वाढल्याने मंदिराचा दर्शनी भाग अचानक कोसळला. सुदैवाने यावेळी मंदिरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली असून पुढील धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे