न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते बांद्यात मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन 

सिंधुदुर्ग /राजू तावडे

   ‘पोस्टर ऐवजी, आरोग्य सेवा’ हा संदेश घेऊन बांदा येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्यामकांत काणेकर व भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजप सिंधुदुर्ग व कोकण संस्था मुंबई यांच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शेकडोंच्या संख्येने रुग्णांनी सहभागी होत लाभ घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘मोफत महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आलेय. सोमवारी बांदा जिल्हा परिषदेत याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, रुपाली शिरसाठ, उन्नती धुरी, मधुकर देसाई, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई, श्यामकांत काणेकर, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल, शहराध्यक्ष विकी कदम, जावेद खतिब, राजाराम सावंत, शितल राऊळ, प्रसाद पावसकर, नितीन सावंत, निलेश नाटेकर, बाबा काणेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरासाठी रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ.डी.वाय. पाटील हाॅस्पिटल यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचा विशाल परब यांचा संकल्प या महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून साकार होत असून यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रियांका नाईक यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे